शनिवार, २९ नोव्हेंबर, २०२५
शुक्रवार, ५ सप्टेंबर, २०२५
संघर्षातून यशाकडे: मजुरी ते कॉर्पोरेट मॅनेजरपर्यंतचा माझा प्रवास
आयुष्यात अनेकदा कठीण प्रसंग येतात, पण ते आपल्याला हरवण्यासाठी नसून घडवण्यासाठी असतात. माझा हा प्रवास जिद्द, त्याग आणि अथक परिश्रमांची गोष्ट आहे.
- प्राथमिक शिक्षण: जिल्हा परिषद शाळा, भारतगाव (सातारा) येथून ७ वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण.
- माध्यमिक शिक्षण: श्री छत्रपती प्रतापसिंह महाराज हायस्कूल, भारतगाववाडी येथून १० वी (६०.१३%) यशस्वीरीत्या उत्तीर्ण.
- विज्ञान शाखा: १२ वी विज्ञान (PCB) करत असताना कौटुंबिक परिस्थितीमुळे मी फुलांच्या बागेत मजूर म्हणून काम केले. केवळ ४ रुपये प्रति हजार फुले तोडण्याचे काम करून मी माझ्या शिक्षणाची ओढ कायम ठेवली.
- वडिलांचे निधन: बी.एस्सी. प्रथम वर्षात असताना वडिलांच्या आकस्मिक निधनाने आयुष्याला कलाटणी मिळाली.
- स्वप्नांचा त्याग: 'केमिकल इंजिनिअर' होण्याचे स्वप्न होते, पण घराची जबाबदारी आणि भावंडांचे शिक्षण यासाठी ते स्वप्न मागे सोडावे लागले.
- शिक्षक पदविका (D.Ed): काकांच्या सल्ल्यानुसार शिक्षण क्षेत्रात पाऊल टाकले आणि कोयना एज्युकेशन सोसायटी, पाटण येथून ७६.६५% (Grade A) मिळवून D.Ed पूर्ण केले.
- शिक्षक म्हणून कार्य: सांगली जिल्ह्यातील नेर्ले येथील इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये २ वर्षे प्राथमिक शिक्षक म्हणून सेवा दिली.
- इंग्रजी विषयात प्राविण्य: शिक्षकी पेशात असतानाच दूरस्थ शिक्षण घेऊन B.A. (English) पूर्ण केले. कला व वाणिज्य महाविद्यालय, सातारा येथे मी एफ.वाय. आणि एस.वाय. मध्ये 'Subject Topper' ठरलो आणि विशेष श्रेणीत पदवी संपादन केली.
- कौशल्याचा विस्तार: शिक्षण सुरू असतानाच सॅमसंग सर्व्हिस सेंटरमध्ये मोबाईल हार्डवेअर रिपेअरिंगचे काम करून तांत्रिक कौशल्ये मिळवली.
- D-Mart (फूड सेफ्टी ऑडिटर): २०१८ मध्ये डी-मार्टच्या पुणे रिजनल ऑफिसमध्ये माझी निवड झाली. संपूर्ण भारतातील १७ ऑडिटर्सचा डेटा हाताळणे आणि पुणे विभागाचे फूड सेफ्टी ऑडिट करण्याची महत्त्वाची जबाबदारी मी यशस्वीपणे सांभाळली.
- कौटुंबिक यश: २०२१ मध्ये वडिलांच्या अनुपस्थितीत मोठी जबाबदारी म्हणून मी माझ्या बहिणीचे (मीनाक्षी - M.Sc Maths) लग्न लावून दिले. हा माझ्या आयुष्यातील सर्वात समाधानाचा क्षण होता.
- E-Store India (एरिया मॅनेजर): येथे माझी पदोन्नती 'एरिया मॅनेजर' म्हणून झाली, जिथे मी सातारा जिल्ह्यातील ९ स्टोअर्स आणि ३९ कर्मचाऱ्यांचे व्यवस्थापन पाहिले.
- Store Manager: सध्या मी Seela Infratech Pvt Ltd (दक्षिण कोरियन कंपनी) येथे स्टोअर मॅनेजर म्हणून कार्यरत आहे.
- महत्त्वाची भूमिका: इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व आणि व्यवस्थापकीय अनुभवामुळे मी आज मॅनपॉवर हँडलिंग, कस्टमर को-ऑर्डिनेशन आणि स्टोअर ग्रोथ या जबाबदाऱ्या पार पाडत आहे.
शेत मजुरी करणाऱ्या मुलापासून ते एका MNC कंपनीच्या मॅनेजर पदापर्यंत पोहोचण्याचा हा मार्ग 'काट्याकुट्यांचा' होता. पण आज मागे वळून पाहताना जाणवते की, प्रत्येक अडथळ्याने मला अधिक मजबूत केले.
गुरुवार, १३ मार्च, २०२५
झुंज मृत्यूशी अन चांगुलपणाच्या निष्टेची..!!
काल, बुधवार १ २ मार्च २ ० २ ४, रात्रीची वेळ साधारणतः २ :४ ५ ची . . नीरव शांतता, सगळेच गाढ झोपेत अन अचानक जाग येते एका आर्त वेदनादायी, खूपच खोल अशा एका मांजराच्या ओरडण्याची किंकाळीने . .!! रात्रीची वेळेस कुत्रा अन मांजर यांच्या जन्मजात वादाला ऊत येतो हे आपण सर्वांना माहितीच आहे . . मी पहिल्या मजल्यावर राहतो तिथं दरवाज्याजवळून ही आर्त किंकाळी इतक्या जोरात ऐकू आली नि मी ताडकन झोपेतून उठून दरवाज्याकडे धावलो, दरवाज्याच्या पलीकडे खेळ चालू होता जीवन अन मृत्यूचा . ..एक भयानक तांडव जिथं जवळपास मृत्यूचा विजयच होणार होता.. पण खरं सत्य हेच असावं कि वेळ आली नव्हती म्हणून त्या मांजर ला काळ देखील काहीच करू शकला नाही . .
दरवाजा उघडताच पहिले दोन कुत्रे नि एक मांजर यांचा याचा मृत्यू तांडव . . माझ्या हुसकावण्याच्या हस्तक्षेपाने ते दोन कुत्रे थबकले.. मांजराला त्यांचे दात लागले होते . .रक्तबंबाळ अवस्था झाली होती.. मांजराच्या हृदयाची धडधड स्पष्ट दिसत होती..घाबरलेले हतबल मांजर, त्याची मृत्यूच्या जबड्यातून झालेली सुटका यामुळे त्याने सुटकेचा निश्वास सोडला होता. आर्त वेदनेने विव्हळत विव्हळत त्याने उंबऱ्यावर डोके ठेवलं . क्षणभरही वाटलं संपली झुंज त्या जीवाची अन विजय मिळाला त्या जीवनाच्या अंतिम सत्याचा . .!! पण पुन्हा तरारले डोळे वेदनेने व्याकुळ आवाजात त्यानं विजय मिळवला मृत्यूवर असे दाखवत टाकलेली मान सावरली . . हालचाल करण्याचा प्रयत्न केला, पण त्या कुत्रांच्या दातांनी त्याचे पोटापासून मागे इतके हालहाल केले होते कि त्याला मागील पायावर उभं राहता येईना.तिथेच उंबऱ्याच्या फरशीला उशी समजून त्याने पुन्हा मान ठेवली.. होणाऱ्या यातना स्पष्ट दिसत होत्या..मी तिथेच असता, पुन्हा ती दोन्ही कुत्री परत फिरून आली..पुन्हा त्यांना मी हुसकावून लावले . . जिन्याच्या एन्ट्री वरील शटर बंद करून घेण्यासाठी खाली आलो..खाली येताना माझ्या फ्लॅट चा दरवाजा हळूच ओढला नि शटर बंद करण्यास धावलो. शटर बंद झाले आणि परत माझ्या फ्लॅट जवळ मांजराजवळ आलो . .मांजर विव्हळताना दिसले, मला पाहताच पुन्हा मदतीसाठी जड झालेली शेपूट हलवून त्याने मला साद दिली, मनातून वाटत होतं त्याला इलाजाची गरज आहे पण काय करणार कशी मदत करणार याचा विचार करत मी बाहेरून दरवाजा उघडण्यास जोर लावला . .
नवीन प्रकारचे लॉक असलेले फ्लॅट चे दरवाजे ऑटोमॅटिक आतून लॉक होतात, त्यांना बाहेरून उघडण्यासाठी चावी लागते. आता मी बाहेर येताना ना मोबाईल आणला होता ना चावी..!! आता मांजर नि बाहेरच होतो . . . रूम मेट IT मध्ये विप्रो मध्ये असल्याने तो अद्याप आला नव्हता याची मला कल्पना होती. आता काय करायचे, आत जायचे कसे ? ना बेल वाजवून कोणी आतून दार उघडणार नव्हतं ना कुणाला कॉल करता येणार होता..!! एका निरागस जीवाला वाचवले या आनंदाला आता भीती चे सावट यायला लागलं होते. त्या जीवाला वाचवले हे वेगळे होते नि मी ज्या परिस्थिती मध्ये अडकलो होतो हे काही वेगळंच होतं . मनात एकच विचार होता मी काही वाईट केले नाही, जे काही केले ते योग्यच केले आहे . .यातून मार्ग नक्कीच मिळेल यावर माझा आत्मविश्वास तग धरून होता .
अवस्था अशी होती ना कोणी मदत करू शकत होते ना मी कुणाला एवढ्या रात्री बोलावू शकत होतो. मार्ग शोधावा लागेल म्हणून ग्राउंड लेवल ला आलो, मांजर माझ्या पहिल्या मजल्यावर विव्हळत आहे माहिती होते . .शटर च्या बाहेर अजून ही ती कुत्री दबा धरून बसलेली दिसली.. मी येताच माझ्यावर गुरगुरत लांब पळायला लागली, संधी मिळताच जवळच असलेल्या काठीने त्यांना पुन्हा हुसकावून लावण्यात मला यश आले नि ती कुत्रे भुंकत ४ फुटी वॉल कंपाऊंड वरून उद्या मारून बाहेर पळाली नि मोठा उसासा टाकला. पुन्हा शटर नीट लावले नि वर कसे जायचे याचा विचार करत ग्राउंड पार्किंग माझ्या बाल्कनी बाजूला आलो . .जेमतेम १ ३ -१ ४ फुटावर माझी बाल्कनी होती.साधारणतः आम्ही बाल्कनी वापरताना आतून सहसा बंद करत नाही याची आठवण झाली.. शूर धाडसी "हिरकणी" ची आठवण झाली, नि एक आयडिया ची कल्पना सुचली..
म्हणतात ना प्रत्येक शॉर्टकट हा धोकादायक असतो. बाल्कनी लागून एक horizontal बीम होता त्यावर चढून मी माझ्या बाल्कनी मध्ये पोचू शकेन आणि बाल्कनी मधून आत जाऊ शकेन हे फायनल झालं. योगायोगाने एक बुलेट बाईक त्या बीम खाली दोन स्टॅन्ड वर पार्क केली होती जी दुसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या एकाची होती. बाईक वर उभे राहून बीम पर्यंत हात पोचत नव्हता हा माझा शारीरिक प्रॉब्लेम होता माझी उंची ५ फूट असल्याने मी अजूनही बीम च्या खाली ३ फूट होतो. बीम वरून काहीतर टाकून मी लोम्बकळत मी २ फूट वर आलो तर बीम चा कॉर्नर हाताला येईल याचा अंदाज घेऊन बाईक वर उभा होतो ते खाली आलो . आता मी शोडयाला लागलो, एखादी रस्सी , दोरी , वायर तथा तत्सम वस्तू जी बीम वरून फेकून त्याला लटकून मी वर जाऊ शकेन अशी..!! पार्किंग च्या एका कोपऱ्यात बराच स्क्रॅप पडला होता . त्यात मोडके टेबल खुर्च्या,इलेक्ट्रॉनिक बंद पडलेली उपकरणे, वायर वगैरे . मला त्यात इंटरनेट केबल सापडली जी optic fibre प्रकारची, मजबूत असते.पण तीअखंड वायर कामाची नव्हती ती एका ठिकाणी बांधून ठेवली होती अन जी बाल्कनी च्या बीम पर्यंत पोहचून परत माघारी येणे अवघड आहे असे वाटलं अन आशेची निराशा झाली..
आजूबाजूला शांत वातावरण, कुटून तरी मधूनच हॉर्न चा आवाज, रिक्षाचा आवाज तर कुठे मोटार बाईक चा आवाज असं शांत वातावरण, अन मनात मात्र निराशाच.. पण प्रत्येक चांगल्या कामात त्रास होतोच याची प्रचिती मला होतीच. मग काय पुन्हा थोडं शोधाशोध करायची मार्ग मिळेलच याची खात्री होती. रात्रीचे ३ वाजून गेले होते, तितक्याच मला ग्राउंड फ्लोअर ला असणाऱ्या नळाला लावलेल्या फ्लेक्सिबल, रबरी अर्ध्या इंचाचा पाइप दिसला. पाईप ननळाच्या तोटीला तारेने कसून आवळला होता, भरपूर प्रयत्न करून अखेर त्याला सोडवून त्यात जमा असलेले पाणी काढून पाइप हलका केला.. आणि अखेरचा प्रयत्न यशस्वी होणारच या आत्मविश्वासाने त्या बुलेट बाईक वर चढलो.
आणि म्हणतात ना तुम्ही जर खरंच मनोमन चांगली कृती करत असाल तर तुमच्या प्रयत्न वाया जात नाहीत.. नि असाच झाले पहिल्या प्रयत्नात तो पाईप मी बीम वरून फेकून त्याचे दुसरे टोक हातात मिळवण्यास यशस्वी झालो. पाईप बीम वरून टाकताना तो दुमेरी (दोन पदरचा ) टाकला होता . माझ्या ५ ० किलो वजनाच्या मापाची त्याची क्षमता आहे याचा अंदाज घेतला नि पाइप ला लटकत दोन फूट वर असलेल्या बीम ला माझा हात जाऊन पोचला. आता पोचल्यात जमा आहेत असे समजून पूर्ण ताकतीने बॉडी,पाय उचलून मी अखेर बीम वर पोचलो. प्रयत्न अन यश यांचा किती जवळचा संबंध असतो याची पुन्हा प्रचिती आली. बीम वर बसून ती गुंडाळलेली पाईप सोडवून बाल्कनी मध्ये पाय टाकला. बाल्कनी चा दरवाजा उघडला आणि अखेर खुष्कीच्या मार्गाने गडावर दाखल झाल्याची फीलिंग आली, मोहीम फतेह झाली.
पाइप व फ्लॅट ची चावी घेऊन मुख्य दरवाज्या उघडला, बाहेर ते विव्हळत असलेले मांजर पाहून मनात हळहळ झाली. त्याच्या पायातून रक्त वाहत होते. पाईप ठेवायला खाली गेलो. फ्लॅट वर राहणारे काही मांजरप्रेमी मंडळी नि मीटर बॉक्स वर Purpet पॅकेट्स ठेवल्याचे माहिती होते ते घेऊन शटर बंद करून वर आलो. मांजराकडे पाहून आता ते भीतिमुक्त असल्याचे भासले. इतक्यात आमचे IT वाले मित्र येऊन पोचले. त्यास बसायला त्यांनी door mat टाकले . अर्थातच त्या जीवाची झालेली अवस्था पाहून त्याला पाणी पाजण्यास ते सरसावले. थोडे पाणी पिऊन त्याने purpet food खाऊन थोडे कुरवाळले. गरज होती त्याला दवाखान्यात न्यायची..पण रात्रीचे ३ :२ ० झाले होते . ४ ० ० मीटर वर Pet क्लिनिक जवळच होते, नेट वरून नंबर घेऊन संपर्क साधण्याचा प्रत्यन केला पण समोरून प्रतिसाद मिळाला नाही. झालेला सर्व थरारक घटनाक्रम त्यांना सांगितला, पोटभर हसत त्या विलक्षण घटनेच्या शेवटी त्या मांजराला सकाळी ९ वाजता Pet क्लिनिक ला घेऊन जाऊ असे ठरवून आम्ही ४ च्या दरम्यान निद्रेच्या अधीन झालो. पुन्हा जाग अली तेव्हा ६ :३ ० वाजले होते, उठून प्रथम मुख्य दरवाजा उघडून मांजर कसे आहे हे पाहण्यास गेलो, मांजर तिथे नव्हतीच, तिथं उरली होती रक्ताचे डाग, पाण्याचा बाउल..!! दिस उजाडण्याआधीच मांजराने तिथून मार्ग काढत आपल्या मालकाचे घर गाठले असावे, असा सकारात्मक निष्कर्ष काढत पुढील दिनचर्या सुरु केली..
याचे तात्पर्य एवढेच कि एखाद्याचे चांगलं करताना खूप त्रास होतो. नि चांगलं करताना त्रास होईल म्हणून चांगलं करायचे बंद करायचे नाही..
माझ्या सोबत हा घडलेला प्रसंग कसा वाटलं नक्की कळवा . .
mr.satishkrs@gmail.com_WhatsappNo.9766392240


