७ फेब्रुवारीचा तो गुलाब, आज कोमेजून गेला,
माझ्या आयुष्याचा सुगंध, दुसऱ्याच्या दारी गेला.
मी जिच्यासाठी जगलो, तिने वेगळीच वाट धरली,
माझ्या निस्वार्थ विश्वासाची, आज राखरांगोळी झाली.
एक सुंदर 'स्वप्न' पाहिलं होतं, जे आता अधूरं राहील,
डोळ्यांतल्या या थेंबांतून, आता फक्त दुःखच वाहील.
ती खुश असेल कोणासोबत, तर तेच माझं नशीब मानतो,
पण या आठवणींच्या छळाला, मी प्रत्येक क्षणी जाणतो.
आता शेवटची ही ओळ, अन् कायमचा अबोला असेल,
पुन्हा कधीच भेटणार नाही, हाच माझा शब्द असेल.
या देहातून प्राण जावे, हीच आता एक आस आहे,
कारण तुटलेल्या या हृदयाला, प्रत्येक श्वास फास आहे.
जेव्हा निवांत निजलेला असेल मी, मरणाच्या त्या कुशीत,
सारे झुकतील समोर माझ्या, नतमस्तक त्या स्थितीत.
पण तिने मात्र झुकू नये, नसावी तिच्या डोळ्यांत आसवे,
फक्त एक निरोप म्हणून, एक गुलाब हाती असावे.
जे 'स्वप्न' मी पाहिलं होतं, ते धुळीत मिळून जाईल,
तिने दिलेला तो गुलाब, माझ्या प्रेमाची साक्ष राहील.
माझ्या देहावरच्या त्या फुलाने, सुगंधी माझा अंत व्हावा,
ज्या आठवणींनी छळलं मला, त्यांचा तिथेच विसर पडावा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा