"नमस्कार,माणूस म्हणून जगत असताना आपण अनेक नाती कमावतो आणि काही गमावतो. पण काही नाती अशी असतात, जी केवळ रक्ताने नाही तर थेट हृदयाच्या ठोक्यांशी जोडलेली असतात. ही नातीच आपल्याला कधी जगण्याची नवी उमेद देतात, तर कधी त्यांच्या दुरावण्याने काळजावर कायमचा घाव बसतो.
'नातं: जगण्याचं सार आणि विरहाचा आघात'..."
देतात जगण्याला प्रेरणेचा आधार;
जगायला शिकवणारा तो एक मृदगंध,
कधी न तुटणारा अतुट असा बंध. [१]
तेव्हा जणू जगणंच मध्येच थांबतं;
हृदयाच्या ठोक्यांची मंदावते गती,
कळत नाही कशी आली ही दुर्दशा-गती. [२]
फक्त आठवणींचे गाठोडे मागे उरते;
काही आठवणी जणू हलकीशी वेदना,
तर काही काळजावर खोलवर जखमा. [३]
जगण्याची उमेद मग हळूहळू मावळते;
ज्या नात्याने कधी बहार आणला होता,
त्याच्याच विरहाने आज मृत्यूचा घाला घातला होता. [४]
पण गमावल्याची पोकळी दुसऱ्याने भरत नाही;
काळानुसार घेतलेले काही कठोर निर्णय,
शेवटपर्यंत देतात फक्त दुःखाचेच पर्याय. [५]
काही मात्र कायमची गुमनाम राहतात;
नाव असो वा नसो त्या हृदयाच्या नात्याला,
तीच छळत राहतात आयुष्याच्या प्रवासाला. [६]

